क्षुल्लक कारणावरून फावड्याने मारहाण

एकावर गुन्हा दाखल, कळमना येथील घटना

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील कळमना येथे सोमवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास क्षुल्लक कारणावरून एका इसमास फावड्याने मारहाण केल्याचा घटना घडली. फिर्यादी महादेव तात्याजी धांडे यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध वणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

सविस्तर वृत्त असे की महादेव हे तालुक्यातील कळमना येथे राहतात. सोमवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास महादेव हे वणीला जाण्यास आपल्या दुचाकीने निघाले. रस्त्यात आरोपी गजानन पुरुषोत्तम धांडे (33) रा. कळमना यांची बैलगाडी रस्त्यावर उभी होती. महादेव यांनी गजाननला बैलगाडी बाजूला घेण्यास सांगितले. यावर गजानन चिडला व त्याने फावड्याने महादेव यांच्या पाठीवर वार केले व जीवे मारण्याची धमकी दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मारहाणी नंतर महादेव यांनी वणी गाठले व याबाबत पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी गजानन धांडे विरोधात भादंविच्या कलम 326, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सहाय्यक फौजदार प्रभाकर कांबळे करीत आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.