शौचास गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

नवरगाव येथील घटना, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

भास्कर राऊत, मारेगाव: सायंकाळच्या वेळेस शौचास गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आला. सदर घटना सोमवारी दि. 9 मेला तालुक्यातील नवरगाव येथे घडली. गणेश अरुण हादवे (21) असे आरोपीचे नाव असून तो गावातीलच रहिवाशी आहे.

Podar School 2025

नवरगाव येथील एक अल्पवयीन मुलगी सोमवारी नेहमीप्रमाणे शौचासाठी गावाबाहेर जात होती. त्यावेळी एका 21 वर्षीय युवकाने या मुलीचा वाईट उद्देशाने हात पकडला व गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला, सदर मुलीने याविषयी आपल्या कुटुंबियांना माहिती दिली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

दि. 9 तारखेलाच रात्रीच्या वेळेस पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. यावरून नवरगाव येथीलच गणेश अरुण हादवे या 21 वर्षीय आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम 354 तसेच बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला मारेगाव पोलिसांनी रात्रीस अटक केली असून पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहेत.

हे देखील वाचा:

Comments are closed.