झरी पंचायत समितीमध्ये आशा दिन साजरा

0

राजू कांबळे, झरी: पंचायत समिति झरी येथे दिनांक 1 डिसेंबर रोजी आशा दिवस साजरा करण्यात आला. या दिनानिमित्य रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, नृत्य स्पर्धा घेण्यात आल्या. तसंच सर्व आशांची आरोग्य तपासणी घेण्यात आली. यावेळी त्यांना त्यांच्या कामाबदल मार्गदर्शन करण्यात आले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिति सभापती लताताई आत्राम या होत्या. महिलांना आपण कशा प्रकारे मदत केली पाहिजे या विषयी आशांना माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास गटविकास अधिकारी चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी गेडाम तसेच आरोग्य कर्मचारी कु. मनीषा शेंडे सहभागी होत्या.

आशा समूह संघटक श्री. नसकुलवार, माहुरे, सोयामताई व् तालुक्यातील सर्व गटप्रवर्तक, त्याच प्रामाणे तालुक्यातील संपूर्ण आशा हजर होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. स्नेहाली वानखेड़े यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीमती राठोड यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.