बस स्थानाकासमोर प्रवासी ऑटो पलटी, 2 महिला जखमी

शहरातील रस्त्यांवर ऑटोचा धुमाकूळ

जितेंद्र कोठारी, वणी : प्रवासी ऑटो पलटी होऊन 2 महिला जखमी झाल्याची घटना आज गुरुवार सकाळी 10.30 वाजता येथील बस स्थानाकासमोर घडली. जखमी महिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी पोलिसांनी ऑटोचालक विरुद्द गुन्हा नोंद केला आहे.

प्राप्त माहितीनुसार वणी ते नांदेपेरा मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणारा तीनचाकी ऑटो क्रमांक (MH29V9744) च्या चालकाने निष्काळजीपणे ऑटो चालवून बस स्थानक समोर ऑटो पलटी केले. त्यावेळी ऑटोमध्ये 2 महिला प्रवासी बसून होत्या. या अपघातात अनिता जंगटे व शोभा वाघाडे दोघी रा. दामले फैल ही महिला प्रवासी जखमी झाली. ऑटोचालक मद्यप्राशन करुन व विना परवाना ऑटो चालवीत असल्याचे सांगण्यात येते.

प्रवासी ऑटोचा रस्त्यावर धुमाकूळ –
शेकडोंच्या संख्येने परवानाधारक व अवैध प्रवासी ऑटो शहरातून रस्त्यावर धावत आहे. बस स्थानक परिसर, वरोरा रोड व साई मंदिर परिसरात या अवैध ऑटोचालकाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावर भरधाव ऑटो चालविणे, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून ऑटो चालविणे, रस्त्यावर कुठेही ऑटो उभा करून प्रवासी बसविणे असे दृश्य रोजचे झाले आहे. वाहतूक पोलिसांनी अनेकदा कारवाया करुनही ऑटो चालकांची मुजोरी वाढत चालली आहे. ऑटो चालकांना काही राजकीय नेत्यांचे वरदहस्त असल्यामुळे ते कोणालाही जुमानत नसल्याचे बोलले जाते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.