नालीच्या कामामुळे विजेचे खांब कोसळण्याची भीती

नांदेपेरा-खैरी रोडच्या कडेला नालीचे खोदकाम

भास्कर राऊत, मारेगाव: रस्त्याच्या बाजूला नालीच्या काठावर वीजेचे खांब आल्याने पावसाळ्यात हे खांब कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. वीज मंडळाचे कर्मचारी, अधिकारी दररोज या रस्त्याने जाणे येणे करतात. परंतु ही बाब त्यांच्या लक्षात नं येणे हे सर्वात मोठे आश्चर्य मानले जात आहे. याकडे वरिष्ठ जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करीत नाही नाही अशी शंका नागरिक उपस्थित करताना दिसत आहे.

काही महिन्यापूर्वी नांदेपेरा ये खैरी या मार्गाचे काम करण्यात आले. हे काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनी नालीचे खोदकाम करण्यात आले. याच रस्त्याच्या कडेला मार्डीवरून वीज वाहून नेणारे खांब आहे. नालीचे काम जिथून करण्यात आले त्या नालीच्या काठावरच हे विजेचे खांब आहे. नालीचे खोदकाम करताना या खंबाच्या जवळून केल्याने या खांबाच्या तळाची माती उघडी पडलेली आहे. त्यामुळे या खांबाला धोका निर्माण झाला आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. पाऊस अधिक झाला की खांबाच्या तळाशी शिल्लक असलेली थोडीशी मातीही वाहून गेली की माती झाल्यावर खांब पडण्याचा धोका जास्त असतो. एरवी इतर कामामध्ये जास्त लक्ष देणारे वीज मंडळाचे अधिकारी व कर्मचारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करीत नाही ना अशी शंका सध्या उपस्थित केली जात आहे.

ठेकेदाराच्या कामाकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
तालुक्यात अनेक ठिकाणी नवीन खांब लावून वीज जोडणीचे काम सुरु आहेत. याकडे अधिकाऱ्यांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. खांब गाडताना खड्डा किती खोल असावा, सिमेंटचे काम कुठपर्यंत असायला हवे, खड्डा कोठे करावा. हे सगळे नियम असताना मात्र ठेकेदार या नियमाची पालमल्ली करताना दिसून येत आहे.

हे देखील वाचा:

देशातील प्रख्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम आता वणीत

चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.