रान डुकराच्या हल्ल्यात 24 वर्षीय युवक जखमी

डोल डोंगरगाव येथील घटना

भास्कर राऊत, मारेगाव: डोल डोंगरगाव (पारधी बेडा) येथील एक 24 वर्षीय युवक सकाळी प्रातःविधीसाठी शेतात गेला असता त्याच्यावर पाठीमागून रान डुकराने हल्ला चढवला. हल्ल्यात युवक जखमी झाला असून वणी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

डोल डोंगरगाव (पारधीबेडा) येथील वासुदेव सदाशिव भोसले (24) हा युवक सकाळी प्रातःविधी साठी शेतात गेला असता, दरम्यान त्याच्यावर पाठीमागून रान डुकराने हल्ला केला डुकराच्या हल्ल्यामुळे युवकाने आरडाओरड केली. त्यामुळे घटनास्थळी परिसरातील नागरिकांनी धाव घेतली.

जखमी युवकास तात्काळ वणीतील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. हल्ल्यात जखमी झालेल्या युवकास वन विभागाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी होत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा:

देशातील प्रख्यात पोदार इंटरनॅशनल स्कूलचा उपक्रम आता वणीत

चला डायनासोर्सच्या थरारक दुनियेत… जुरासिक वर्ल्ड सुजाता थिएटरमध्ये रिलिज

Comments are closed.