कीटकनाशक प्राशन करुन इसमाने केली आत्महत्या

वणी तालुक्यातील बाबापुर येथील घटना

जितेंद्र कोठारी, वणी : तालुक्यातील बाबापुर येथील एका 42 वर्षीय इसमाने कीटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. विनोद नानाजी खुटेमाटे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मृतक विनोद यांनी रविवार 3 जुलैला पहाटेच्या सुमारास राहत्या घरात शेतात फव्वारणी करण्याचे कीटकनाशक औषधीचे प्राशन केले. विनोद याला तत्काळ वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्धकिय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. मृतदेहाचे ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करुन प्रेत कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.

मृतक विनोद खुटेमाटे याच्या मागे आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी आणि आप्त कुटुंब आहे. विनोदने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

Comments are closed.