जितेंद्र कोठारी, वणी: विदर्भातील सुपरिचीत सहकारी पतसंस्था असलेल्या श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणुक नुकतीच संपन्न झाली. या निवडणुकीत अॅड. देविदास काळे यांच्या गटाने एकहाती सत्ता स्थापन केली. या निमित्ताने दै. अभिकर्ता असोसिएशनच्या वतीने अॅड. काळे यांचा सत्कार करण्यात आला.
वणी येथे रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे मुख्य कार्यालय आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल 800 कोटीच्या जवळपास असुन 42 हजार सभासद आहे. संस्थेच्या 14 शाखा यवतमाळ, चंद्रपूर, नागपूर, वर्धा येथे कार्यरत आहे. तर 8 शाखा प्रस्तावित आहे. श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेचे मागील 20 वर्षांपासून अॅड. देविदास काळे हे अध्यक्षपदी कायम आहे. एका लहानशा कक्षातील कार्यालयातुन सुरू झालेली घौडदौड विशाल वटवृक्षात करण्यासाठी अॅड. काळे आणि संचालक मंडळानी कठोर परीश्रम घेतले आहे.
रंगनाथ स्वामीच्या कार्यरत 14 शाखेतील शेकडो दैनिक अभिकर्त्यांनी स्वताच्या न्याय हक्काकरीता अभिकर्ता असोसिएशन ही संघटना स्थापन केली आहे. या संघटनेतील कार्यकारणीमध्ये 11 सदस्य असुन 150 सभासद पतसंस्थेच्या उन्नतीकरीता प्रयत्नरत आहे. अभिकर्ता असोसिएशनचे अध्यक्ष सागर बोढे, सचिव अविनाश कडु व उपाध्यक्ष तेजराज ठाकरे यांनी नवनिर्वाचीत अध्यक्ष अॅड. देविदास काळे यांना पुष्पगुच्छ देउन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments are closed.