जंगलात आढळला विष प्राशन केलेला तरुण

कुंभा येथील तरुणाची मछिंद्रा शिवारात आत्महत्या

जितेंद्र कोठारी, वणी: मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील रहिवासी असलेल्या एका तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. बुधवारी दिनांक 6 जुलै रोजी संध्याकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. रमेश किसन पावनकर (27) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. रमेश हा बुधवारी दुपारी कामानिमित्त बाहेरगावी गेला होता. सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास मार्डी – मच्छिन्द्रा जवळील जंगलातील वाघोबा मंदिराजवळून काही शिक्षक जात असताना त्यांना तो रस्त्याच्या कडेला पडून असल्याचे निदर्शनास आले. रमेशने विषारी द्रव्य प्राषन केल्याचे लक्षात येताच शिक्षकांनी त्याला तात्काळ मार्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यांची प्रकुर्ती चिंताजनक असल्याने येथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून त्याला पुढील उपचारासाठी वणी येथे रेफर केले. पण वणी येथे नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मागे आई,वडील, दोन मोठे भाऊ व एक विवाहीत बहीण असा आप्त परिवार आहे.  रमेशने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहे.

Comments are closed.