जितेंद्र कोठारी, वणी: शहराजवळ असलेल्या केसुर्ली जंगल परिसरात सुरू असलेल्या कोंबडबाजारावर वणी पोलिसांनी शुक्रवारी संध्याकाळी धाड टाकली. या कारवाईत सहा जुगाऱ्यांना अटक करण्यात आली व सुमारे साडे सात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात 21 दुचाकींचा समावेश आहे. तर एक कोंबडाही ताब्यात घेण्यात आला आहे.
रमेश वासुदेव बोथकर (47) रा. शास्त्रीनगर वणी , विनोद भगवान बावणे (42) रा. परमडोह, चेतन गुलाब काळे (38) रा. रासा, नरेंद्र पातेकर (30) रा. माजरी, राहुल अरुण मत्ते (28) रा. रासा, अनुराग सुरेश गोगला (28) रा. घुग्गुस असे अटक कऱण्यात आलेल्या जुगा-यांची नावे आहेत.
केसुर्लीच्या जंगलात कोंबडबाजाराचा जुगार सुरू असल्याची टीप पोलिसांना मिळाली होती. कोंबड्यांच्या झुंजीवर जुगार खेळणे सुरू असतानाच ही धाड पडली. या कारवाईत पोलिसांनी 7 लाख 26 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात तब्बल 21 दुचाकींचा समावेश आहे.
पोलिसांची धाड पडताच कोंबडेही पळाले !
धाड पडताच जुगा-यांनी दुचाकी घटनास्थळी सोडून पळ काढला. मात्र 6 आरोपी पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईत केवळ एकच कोंबडा ताब्यात घेण्यात आला आहे. 21 दुचाकी जप्त होत असताना केवळ एकच कोंबडा पोलिसांच्या हाती लागला आहे. त्यामुळे धाड पडताच कोंबडेही पळाले की काय ? अशी खमंग चर्चा परिसरात सुरू आहे.
हे देखील वाचा:
Comments are closed.