आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये आजपासून ‘फ्रीडम’ ऑफरला सुरुवात

ब्रँडेड वस्तूंवर 30 हजारांपर्यंतची होणार बचत, प्रत्येक वस्तूंच्या खरेदीवर मिळणार स्पेशल गिफ्ट

बहुगणी डेस्क, वणी: शहरातील अल्पावधीतच लोकप्रिय आणि ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले आझाद इलेट्रॉनिक्स (माहेर कापड केंद्र समोर, मार्केट रोड) तर्फे 15 ऑगस्ट निमित्त ‘आझाद’ म्हणजेच ‘फ्रीडम ऑफर’ लॉन्च करण्यात आली आहे. यात प्रत्येक इलेक्ट्रॉनिक्स वस्तू व होम अप्लायन्सेसवर 30 हजार रुपयांपर्यंतची घसघशीत सुट देण्यात येणार आहे. एलईडी टीव्ही 4499 रुपये, ऱेफ्रिजरेटर 9499, वॉशिंग मशिन 6499, एसी 24999 रुपये तर होम थिएटर अवघ्या 1499 रुपयांपासून ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. खरेदीवर मोफत एक्सटेंडेड वॉरंटी, एक ईएमआई फ्री व कॅशबॅकही ग्राहकांना मिळणार आहे. विशेष म्हणजे ही ऑफर इथेच संपत नाही तर ग्राहकांना फोन, होम थिएटर, इअर बड, ब्लूटूथ स्पिकर गिफ्ट दिले जाणार आहे. ही ऑफर केवळ स्वातंत्र्य दिनानिमित्त असल्यामुळे फक्त एक आठवडा ग्राहकांना या सेलचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी डेमोसाठी त्वरित आझाद इलेक्ट्रॉनिक्स येथे भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्स तर्फे करण्यात आले आहे.

ऍन्ड्रॉईड टीव्हीवर घसघशीत सुट
आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये सोनी, सॅमसंगस, वन प्लस, रिअलमी, एमआय शाओमी, एलजी, ओनिडा इत्यादी कंपनीच्या ऍन्ड्रॉईड टीव्ही उपलब्ध असून 32 इंच ऍन्ड्रॉईड टीव्ही अवघ्या 6999 रुपयांपासून सुरू आहे. तर 40 इंच 10,499 रुपयांपासून मिळणार आहे. याशिवाय वन प्लसच्या टीव्हीवर विशेष सूट देण्यात आली आहे. इतके जम्बो डिस्काउंट ग्राहकांना वणीमध्ये पहिल्यांदाच देण्यात येत आहे.

खरेदीवर एक्सटेंडेड वॉरंटी व आकर्षक गिफ्ट
ग्राहकांच्या सुविधेसाठी होम अप्लायन्सेसवर बजाज फायनान्सतर्फे 0 टक्के व्याज दरात ईएमआयची सेवा देखील पुरवली जात आहे. केवळ ईएमआयच नाही तर वस्तूंवर एक वर्षांचा प्रॉडक्ट इन्शुरन्स ज्याची किंमत 1499 रुपये आहे. हा इन्शुरन्स मोफत दिला जाणार आहे. 1999 रुपयांची एक वर्षांची एक्सटेंडेड वॉरंटी, 2 वर्षांची 2999 एक्सटेंडेड वॉरन्टी यासह 10 वर्षांची फ्री वॉरंटी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वस्तू या 0 % डाऊनपेयमेंटवर खरेदी करता येणार आहे. बजाज फायनान्सच्या ईएमआयवर एक महिन्याचा ईएमआय फ्रि राहणार आहे. तर क्रेडिट कार्डने केलेल्या खरेदीवर 12 हजारांपर्यंत कॅशबॅक देखील दिली जाणार आहे. सोबतच ग्राहकांना फोन, होम थिएटर, इअर बड, ब्लूटूथ स्पिकर यापैकी एक गिफ्ट दिले जाणार आहे.*  त्यामुळे ग्राहकांची चांगलीच बचत होणार आहे.

आझाद इलेक्ट्रॉनिक्समध्ये एलजी, सॅमसंग, गोदरेज, व्हर्लपूल, आयएफबी, बॉश, हायर, पॅनासॉनिक, लॉईड, ब्लू स्टार, पॅनासोनिक, हिताची, मितुशुबी, फिलिप्स, सोनी इत्यादी कंपनीचे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. यात रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन, मायक्रोव्हेव, ओटीजी, होम थिएटर, डीजे बॉक्स इत्यादी उपलब्ध आहेत. यात 25 हजारांपर्यंतची घसघशीत सूट दिली जाणार आहे.

ऑफर केवळ स्वांतंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तच…
 सध्या संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय. हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी प्रत्येकाने मुक्तपणे खरेदी करावी यासाठी आम्ही बँडेड वस्तूंवर हजारो रुपयांचे डिस्काउंट देत आहोत, सोबतच ग्राहकांना प्रत्येक वस्तूंवर एक आकर्षक गिफ्ट मिळणार आहे. मात्र ही ऑफर केवळ मर्यादीत कालावधीसाठी राहणार आहे. त्यानंतर ग्राहकांना या ऑफरमध्ये वस्तू खरेदी करता येणार नाही व विशेष ऑफर देखील लागू राहणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी लवकरात लवकर या ऑफरचा लाभ घ्यावा.
– अमरवाणी बंधू, संचालक आझाद इलेक्ट्रॉनिक्स

आझाद इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व प्रकारच्या होम अप्लायन्सेच्या विक्रीसाठी परिसरात प्रसिद्ध आहे. सोनी, सॅमसंग, आयएफबी, व्हर्लपूल, बॉश, वन प्लस, फिलिप्स, वोल्टास, पॅनासॉनिक इत्यादी बँडेड वस्तू इथे उपलब्ध आहेत. ऑफरचा लाभ घेण्यासाठी व वस्तूंच्या डेमोसाठी मार्केट रोडवरील शिवाजी चौक, माहेर कापड केंद्रासमोरील आझाद इलेक्ट्रॉनिक्स व शाम टॉकिज जवळील प्रतिष्ठानात भेट द्यावी असे आवाहन आझाद इलेक्ट्रॉनिक्सचे संचालक राजकुमार अमरवानी व दिलीप अमरवानी यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व होम डिलेव्हरीसाठी संपर्क – 7249107005

* नियम व अटी लागू

Comments are closed.