विजय चोरडिया यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम

मोफत भव्य आरोग्य शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया... मॅराथॉन, रांगोळी, स्पर्धा परीक्षेचे आयोजन

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक व समाजसेवक विजय चोरडिया यांचा 4 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम व उपक्रम तसेच विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 2 सप्टेंबर पासून 4 सप्टेंबर असे तीन दिवस मुकुटबन रोडवरील श्रीविनायक मंगल कार्यालय येथे विविध कार्यक्रम घेतले जाणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विजयबाबू चोरडिया मित्र परिवार तर्फे करण्यात आले आहे.

शुक्रवारी दिनांक 2 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता नागपूर येथील सुप्रसिद्ध रेयांश म्युझिकल गृपच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी द्वारा सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. रात्री 9 वाजता श्रीगणेशाचा महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता महिला सक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत गरजू महिलांना शिलाई मशिनचे वाटप केले जाणार आहे. सदर कार्यक्रम इनरव्हील क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटी तर्फे आयोजित करण्यात आला आहे.

शनिवारी मोफत भव्य आरोग्य शिबिर व मोतीबिंदू शस्त्रक्रिया
शनिवारी दिनांक 3 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दु. 4 पर्यंत भव्य नेत्र चिकित्सा व मोती बिंदू शस्त्रक्रिया शिबिर होणार आहे. सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटलच्या सहकार्यातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात डोळ्यांची समस्या असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी केली जाणर आहे. तसेच मोतीबिंदू असणा-या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

याच वेळी निशुल्क रोग निदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. यात हृदयरोग, स्त्रीरोग, बालरोग, अस्थिरोग, चर्मरोग, नाक-कान-घसा इत्यादी आजाराचे मोफत निदान केले जाणार असून रुग्णांना असलेल्या आजारावर निशुल्क औषधी तसेच श्रवणयंत्र देखील दिले जाणार आहे. सदर कार्यक्रम हा नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटलच्या सहकार्यातून घेतला जात आहे. हे दोन्ही शिबिर प्रभू राम जन्मोत्सव समितीद्वारा आयोजित करण्यात आले आहे. हे दोन्ही शिबिर श्रीविनायक मंगल कार्यालय येथे होणार आहे. विशेष म्हणजे या शिबिरात येणा-या सर्व रुग्णांकरीता चहापान व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

रविवारी दिनांक 4 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता मॅराथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा 3.5 किलोमीटरची असून शिवतीर्थापासून या दौडला सुरूवात होणार आहे. प्रा. दिलिप मालेकर यांच्या मार्गदर्शनात जेसीआय वणी द्वारा ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याच वेळी शहरातील विविध चौकात संस्कार भारती रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कार भारती समिती, वणी द्वारा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मॅराथॉन आणि रांगोळी या दोन्ही स्पर्धेतील प्रत्येकी पहिल्या चार विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह बक्षिस दिले जाणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी भव्य स्पर्धा परीक्षा
दुपारी 11 शालेय विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रम स्माईल फाउंडेशन द्वार आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 4 वाजता जिजाऊ नगर, जागृत हनुमान मंदिराजवळ वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवा समिती द्वारा हा उपक्रम राबवला जाणार आहे. सं. 5 वाजता विजय चोरडिया परिवारातर्फे आनंद बालसदन येथे मुलांना कपडे वाटप केले जाणार आहे.

स्पर्धा परीक्षेच्या संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा…

मॅराथॉन स्पर्धेसाठी राजू रिंगोले (9284881655), पियूश चव्हाण (9518753059) या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. तर स्पर्धा परीक्षेत सहभाग घेण्यासाठी सागर जाधव (7038204209) तन्मय कापसे (7517808753) या क्रमांकावर संपर्क साधायचा आहे. या सर्व कार्यक्रमात, उपक्रमात, स्पर्धेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विजय चोरडिया मित्र परिवार तर्फे करण्यात आले आहे.

 

हे देखील वाचा:

मयूर मार्केटिंगमध्ये ‘बाप्पा मोरया’ ऑफरला सुरूवात… खरेदीवर जम्बो डिस्काउंट

शालेय विद्यार्थ्यांसाठी रविवारी भव्य स्पर्धा परीक्षेचे आयोजन

जाधव सर्जिकल क्लिनिकचे बुधवारी होणार उद्घाटन

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.