जितेंद्र कोठारी, वणी: तालुक्यातील लाठी (बेसा) येथील एका तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. अजू प्रभाकर खोके असे या तरुणाचे नाव असून तो 35 वर्षांचा होता. आज सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. अजूची पत्नीने काही महिन्यांआधी आपल्या दोन मुलीसह घर सोडले होते. शिवाय तो शारीरिक व्याधीनेही त्रस्त होता. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलले असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
सविस्तर वृत्त असे की अजू प्रभाकर खोके हा लाठी (बेसा) येथील रहिवासी होता. तो मजुरी करायचा. काही वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याला दोन मुली होत्या. मात्र गेल्या काही काळापासून त्याची पत्नी घर सोडून दोन मुलीसह माहेरी गेली होती. त्यामुळे घरी तो एकटाच राहत असल्याची माहिती आहे.
आज मंगळवारी दिनांक 13 सप्टेंबर रोजी शेजा-यांना अजू गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यांनी याची माहिती तातडीने पोलिसांना दिली. त्यावरून पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करत मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवला आहे. पत्नी सोडून जाणे तसेच आजारपणामुळे आलेल्या नैराश्यातून अजूने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.
वणी उपविभागातील मारेगाव तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात आत्महत्येच्या घटना समोर येत आहे. आता गेल्या काही दिवसांपासून वणी तालुक्यात आत्महत्येचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
हे देखील वाचा:
धक्कादायक – वणी उपविभागातून 8 महिन्यात 112 तरुणी व महिला बेपत्ता
पुन्हा पाटाळ्याचा पुलावरून पाणी, वरोरा-नागपूर जाणारी वाहतूक बंद
Comments are closed.