जितेंद्र कोठारी, वणी: माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केलेल्या अश्लील व गलिच्छ व्यक्तव्याचा निषेधार्थ वणी येथील शिवसैनिकांनी कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून दहन केले.. आज बुधवारी सकाळी वणी येथील शिवाजी चौकात शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी देत हे आंदोलन केले.
शिवसेनेतून शिंदे गटात सामील झालेले रामदास कदम यांनी दोन दिवसांपूर्वी दापोली येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर आक्षेपार्ह टीका केली होती. तसेच उद्धव ठाकरे यांच्या पत्नी राजकीय व्यासपीठावर का दिसतात असा सवाल उपस्थित करत रश्मी ठाकरे यांना देखील लक्ष्य केले होते. रामदास कदम यांच्या टीकेनंतर शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.
शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वास नांदेकर यांच्यासह उपजिल्हा प्रमुख संजय निखाडे, झरी तालुका प्रमुख चंद्रकांत घुगुल, शहर अध्यक्ष सुधीर थेरे, युवासेना अध्यक्ष विक्रांत चचडा, गणपत लेडांगे, संजय आवारी, महेश चौधरी, राजू देवडे, प्रशांत बलकी, रिंकू पठाण व इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Next Post
Comments are closed.