जितेंद्र कोठारी, वणी: येथील शिवाजी चौक परिसरात एका पावभाजी सेंटरवर छापा टाकून 2 बाल कामगारांची सुटका करण्यात आली. बाल कामगार विभाग यवतमाळ व दुकाने निरीक्षक वणी यांच्या पथकाने सोमवारी दुपारी 3 वाजता ही कारवाई केली. सुटका करण्यात आलेल्या बालकांना बाल सुधार गृहात पाठविण्यात आले आहे. फिर्यादी विजय पांडुरंग गुल्हाने दुकाने निरीक्षक वणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी कैलास पावभाजी सेंटरचे मालक ओमप्रकाश धनराज पटेल (39) रा. रामपुरा वार्ड वणी विरुद्ध कलम 374 भादंवि व बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 75, 79 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
काय आहे बाल कामगार कायदा ..!
14 वर्षाखालील मुलांना कोणतेही उद्योग किंवा आस्थापनेवर काम करून घेणे हा बाल कामगार कायद्याचे उल्लंघन आहे. तसेच 14 ते 18 वर्षाच्या मुलांना धोकादायक कामावर ठेवण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. पहिल्यांदा कायद्याचे उल्लंघन केल्यास कमीतकमी सहा महिन्याची कैद किंवा 20 ते 50 हजार पर्यंत दंडाची तरतूद आहे. याशिवाय दंड व कैद एकत्र होऊ शकते. या कायद्यामध्ये आई-वडिलांसाठी देखील हीच शिक्षा आहे.
सोनी कंपनीचे विविध प्रॉडक्ट्स ऑनलाईनपेक्षा कमी कमितीत खरेदीची संधी
Comments are closed.