तिरळी कुणबी संघटनेची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी कार्तीक देवडे तर सचिव पदी नीलेश अ. चौधरी

पुरुषोत्तम नवघरे, वणी: तिरळी कुणबी तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी कार्तीक देवडे तर सचिव पदी नीलेश अ. चौधरी यांची निवड करण्यात आली. शनिवारी 8 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता शहरातील खंडोबा-वाघोबा सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. रामरावजी काळे यांच्या प्रमुख उपस्थिती व डॉ. शांताराम ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला.

ले. कर्नल वासुदेव आवारी यांना श्रध्दाजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक चं. चौधरी यांनी केले. प्रविण इंगोले, अशोक ब. चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना समाजातील अडचणी मांडल्या. तर डॉ. शांताराम ठाकरे यांनी संघटनेचा प्रवास विषद केला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तिरळी कुणबी संघटनेची जुनी कार्यकारणी बरखास्त करुन नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यात अध्यक्षपदी कार्तीक देवडे तर सचिव पदी नीलेश अ. चौधरी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर सदस्य म्हणुन ज्योती ढाले, राहुल इंगोले, आशिष काळे, प्रशांत गोमकर, प्रफुल्ल चौधरी, शुभम इंगळे यांची निवड करण्यात आली.

ज्येष्ठांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवेल व समाजाच्या उद्धारासाठी विविध नवीन उपक्रम राबवणार अशी ग्वाही यावेळी कार्तीक देवडे यांनी दिली, तर तळागाळातील समाजबांधवांना मुख्य प्रवाहात आणून तालुक्यात संघटना वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार, असा विश्वास सचिव नीलेश चौधरी यांनी व्यक्त केला.

कार्यक्राचे प्रास्ताविक सुनिल गोडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार राजू देवडे यांनी मानले. सभेला शरद इंगळे, प्रशांत गोडे, संजय साखरकर, संतोष भेले, सुचित्रा गोडे, राजू साखरकर, शुभम इंगळे, प्रसाद ढाले इत्यादींची उपस्थिती होती.

Comments are closed.