मारेगावात रासेयोद्वारा रक्तदान शिबिर

83 जणांनी केले रक्तदान

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: स्थानीक कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 20 डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्य राष्ट्रीय सेवा योजनेद्वारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यात 83 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले. यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदविला.

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालहाच्या सभागृहात संत गाडगे बाबा पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानंतर रक्तदान शिबिराला सुरुवात झाली. रक्तदान शिबिरामध्ये स्थानिक व शहरातील अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभाग नोंदविला. यात 83 जणांनी रक्तदान केले. या कार्यकर्माच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य अरुण खंडाळकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. चौधरी प्रा. जाधव. प्रा.कुरेकर होते.

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक रासेयो प्रमुख डॉ संदीप केलोडे यांनी केले. या शिबिरासाठी यवतमाळ येथील डॉ आकरे, कानडे, सिद्धर्थ मेश्राम, राहुल भोयर, संजय नेमाडे, रामभाऊ सूर्यवंशी, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यवतमाळचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष जीवन पाटील कापसे तसेच प्राचार्य डॉ अविनाश घरडे यांनी कौतुक केले.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.