गोपाळकृष्ण मार्कंडे यांचे हृदयविकाराने निधन

आज दुपारी 1 वाजता निघणार अंत्ययात्रा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: वणीतील लालगुडा रोडवरील ओम नगर येथील रहिवासी असलेले गोपाळकृष्ण शामरावजी मार्कंडे यांचे गुरुवारी दिनांक 27 ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यान नागपूर येथे निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. ते कृषी विभागातील सेवानिवृत्त अधिकारी होते. दोन दिवसांआधी त्यांना हृदयविकाराचा धक्का आला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 1 मुलगी, नातवंड असा आप्त परिवार आहे. आज दुपारी 1 वाजता त्यांच्या राहत्या घरून (ओमनगर, जन्नत सेलिब्रेशन जवळ, लालगुडा रोड, वणी) त्यांची अंत्ययात्रा निघेल. मोक्षधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

Podar School 2025

Comments are closed.