मटका जुगार अड्यावर धाड: चार आरोपींना अटक

स्थानीय गुन्हा शाखेची कारवाई

विवेक तोटेवार, वणी: गुरुवार सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळ यांची वरली मटका जुगार खेणाऱ्यावर कारवाई करण्यात आली. या कारवाईत 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर चार जण फरार होण्यात यशस्वी झाले. या ठिकाणाहून 2 लाख 3 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल व नगदी जप्त करण्यात आली आहे. सदर मटक्याच्या मालकावर कारवाई होणार काय? याकडे वणीकरांचे लक्ष लागले आहे.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर गुरुवार 11 नोव्हेंबर रोजी स्थानीय गुन्हा शाखा यवतमाळ यांनी मानकी शेतशिवारात धाड केली. येथून विशाल महिपतराव पिसे (44), गजानन वामनराव चिठ्ठलवार (52), मोहमद एकराम उल हक मोहमद खलील (58), अनिस मधुकर लोणारे (50) अशा चार आरोपींना अटक करण्यात आली. तर घटनास्थळवरून चार आरोपी पसार झाले.

सदर शेत हे संभा थेरे रा. मानकी यांचे असून या मटक्याच्या मालक मिनाज शेख असल्याची माहिती आरोपींनी दिली. यांच्याकडून 16 नग मोबाईल, पाच विविध कंपनीच्या दुचाकी, नगदी व वरली मटक्याचे साहित्य असा एकूण 2 लाख 3 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वणी पोलिसात त्यांच्यावर कलम 4,5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा, सहकलम 109 भादवी नुसार गुन्हा नोंद केला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ पवन बनसोड, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप परदेशी पोलीस निरीक्षक स्थानीय गुन्हे शाखा यवतमाळ, सपोनि विवेक देशमुख, पोऊनी सागर भारस्कर, पोउनि रंधे, उल्हास कुरकुटे, विनोद राठोड, महेश नाईक, मीनाक्षी फुसे, रजनीकांत मडावी, वाहन चालक सतीश यांनी केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.