वणीत मशाल रॅली, भव्य रॅलीने वेधले शहरवासीयांचे लक्ष
भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ शहरात निघाली रॅली.... नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
जितेंद्र कोठारी, वणी: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात देशात सुरू असलेल्या भारत जोडो यात्रेच्या समर्थनार्थ खासदार बाळू धानोरकर, माजी आमदार वामनराव कासावार यांच्या मार्गदर्शनात व डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात रविवार 13 नोव्हे. रोजी सायंकाळी 6 वाजता शहरात भव्य मशाल रॅली काढण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत रॅलीचा शिवाजी चौक येथे समारोप करण्यात आला.
कन्याकुमारी ते काश्मिर अशी भारत जोडो यात्रा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू आहे. सध्या या यात्रेचा प्रवास महाराष्ट्रातून सुरू आहे. या यात्रेच्या वातावरण निर्मितीसाठी वणी शहर काँग्रेसच्या वतीने रविवारी मशाल रॅली काढण्यात आली. येथील पाण्याची टाकीजवळ शासकीय मैदान येथून रॅलीला प्रारंभ झाला. त्यानंतर शहरातील टिळक चौक खाती चौक, जटाशंकर चौक, गांधी चौक, गाडगेबाबा चौक, जत्रा मैदान, सरोदय चौक, टागोर चौक, आंबेडकर चौक मार्गाने मार्गक्रमण करीत रॅलीचा शासकीय मैदान येथे समारोप करण्यात आला. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी नफरत छोडो भारत जोडो, भारत माता की जय अशी घोषणाबाजी केली. त्यामुळे शहरात सर्वत्र काँग्रेसमय वातावरण निर्माण झाले होते.
देशात महिला अत्याचाराच्या घटनांत मोठ्या संख्येने वाढ झाली आहे. महागाईने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. परंतु, केंद्रातील सत्ताधाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भारतीय राज्यघटनेमुळे देशात लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवाद टिकवून ठेवता आला आहे. परंतु, सध्या भारतीय राज्य घटनेला धोका निर्माण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. यातून देशातील एकतेला धोका निर्माण होऊ शकते. असे डॉ. महेंद्र लोढा यांनी रॅली समारोप प्रसंगी भाषणात सांगितले.
मशाल रॅलीत डॉ. महेंद्र लोढा, पुरुषोत्तम आवारी, प्रमोद वासेकर, संजय खाडे, प्रमोद निकुरे, आशिष खुळसंगे, रवी देठे, राजाभाऊ बिलोरिया, आबिद हुसैन, अंकुश माफुर, वंदना आवारी, संध्या बोबडे, सविता ठेपाले, विजया आगबत्तलवार, मंदा बांगरे, संगिता खाडे, कविता चटकी, मंगला झिलपे, सुरेखा वडिचार यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ता, विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते.
हे देखील वाचा:
Comments are closed.