मार्डीच्या आदर्श विद्यालयात बालक दिन साजरा

वकृत्व स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

भास्कर राऊत, मारेगाव: तालुक्यातील मार्डी येथील आदर्श माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती सोमवारी बालक दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वि. मा. ताजने होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक अ. का. शिवरकर, र. नी. ढुमने, ज. क. भोंगळे, नि. वि. मेश्राम. ए. झा. येटी. ज्ञा. गो. दातारकर, भा. ग. राऊत, सु. ता. नाखले, अ. ल. कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी नेहरूंच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी दिलेल्या भाषणात प्रथम क्रमांक गौरी देवाळकर, दुसरा हर्षदा गानफाडे, तिसरा देवयानी चौधरी, चवथा अमर खैरे, पाचवा जय मेश्राम, सहावा हिमांशु जुमडे यांनी पटकावला. उत्कृष्ट भाषणं देणाऱ्या विद्यार्थ्यांना ए. झा. येटी यांच्यातर्फे रोख पारितोषिक वितरण करण्यात आले. संचालन सपना जिवतोडे हिने केले. आभार आश्विनी काळे हिने मानले. यशस्वीतेसाठी भास्कर जिवतोडे यांनी सहकार्य केले.

Comments are closed.