मनसेच्या एंट्रीनंतर कामगारांच्या मागण्या मान्य

अडेगाव येथील जगती माईंसच्या कामगारांच्या उपोषणाची सांगता

जितेंद्र कोठारी, वणी: झरी तालुक्यातील अडेगाव येथील जगती मायनिंग कंपनीमधील कामगारांचे विविध मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू होते. पण कंपनी प्रशासनाने उपोषण आंदोलनकडे दुर्लक्ष केले होते. अखेर कामगारांच्या उपोषणाची दखल घेत मनसे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर सोमवारी जगती मायन्स कंपनीत दाखल झाले व कंपनी प्रशासनसोबत चर्चा करून कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करायला भाग पाडले.

अडेगाव येथील जगती मायनिंग या लाईमस्टोन कंपनीच्या कामगारांना दोन वर्षापासून बोनस देण्यात आलेला नाही. वेतन स्लीपही दिली जात नाही. खाणीत काम करताना अत्यावश्यक सुरक्षा कीटचा पुरवठा केला जात नाही. असे विविध आरोप करत कामगारांनी उपोषणाचा मार्ग पत्करला. गेल्या तीन दिवसांपासून उपोषण सुरू असताना कंपनीने याकडे दुर्लक्ष केले.

शेवटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने कामगारांचा प्रश्न हाती घेतला. मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी उपोषण स्थळी भेट देऊन कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली. त्या नंतर कंपनी प्रशासनाने कामगारांच्या मागण्या मान्य केल्या. यावेळी झरी तालुकाध्यक्ष गजानन मिलमीले, वणी तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, झरी तालुका उपाध्यक्ष गुलाब आवारी, वणी शहराध्यक्ष शिवराज पेचे, लक्की सोमकुवर, गुड्डू वैद्य , मिथुन धोटे, वैभव पुरानकर, अरबाज खान आदी उपस्थित होते.

हे देखील वाचा: 

टिळकचौकातील फुटपाथवरील अतिक्रमण उठवले, वणीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरू

T-20 फायनल मॅचवर वणीत बेटिंग… पोलिसांची अड्ड्यावर धाड

 

Comments are closed.