ब्रेकिंग न्यूज- राजू उंबरकर यांना अटक
मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेगाव पोलिसांनी घेतले ताब्यात
जितेंद्र कोठारी, वणी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर याना शेगाव पोलिसांनी अटक केली आहे. अमरावती अकोट मार्गावर शेगाव येथून चार किमी पूर्वी लोहारा जवळ आज दुपारी 4 वाजता मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह शेगाव पोलिसांनी राजू उंबरकर याना ताब्यात घेतले. राजू उंबरकर शेकडो मनसे कार्यकर्त्यांसह शेगाव जाण्यासाठी निघाले होते.
भारत जोडो यात्रे दरम्यान राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर बाबत केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याच्या निषेध करण्याचे आदेश मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिले आहे. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार विदर्भातील शेकडो मनसे कार्यकर्ता राहुल गांधी यांची शुक्रवारी शेगाव येथील सभेत निषेध नोंदविण्यासाठी शेगावकडे निघाले होते. मात्र कायदा व सुव्यवस्था भंग होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना रस्त्यातच ताब्यात घेतले.
वणी येथून राजू उंबरकर यांच्या नेतृत्वात तालुकाध्यक्ष फाल्गुन गोहोकार, शहराध्यक्ष शिवराज पेचे, शुभम भोयर, शुभम पिंपळकर, लकी सोमकुंवर, अज्जू शेख व इतर कार्यकर्ताना शेगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन शहर पोलीस ठाण्यात स्थानाबद्द केल्याची माहिती आहे.
हे देखील वाचा:
प्रवीण खानझोडे: मजुरी ते व्यावसायिक… एका कार्यकर्त्याचा थक्क करणारा प्रवास…
Comments are closed.