शुभम पिंपळकर यांचा कृषीथॉन गुणवंत विद्यार्थी पुरस्काराने सन्मान

नाशिक येथे आमदार रोहित पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

जितेंद्र कोठारी, वणी: कृषिक्षेत्रात शिक्षण घेत असताना कृषिविस्तार, कृषिसंसाधन यासह ग्रामविकास, सामाजिक इ. क्षेत्रात सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या वणीतील शुभम रमेश पिंपळकर यास नाशिक येथे कृषीथॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार वितरणासाठी साठी आमदार रोहीत पवार यांच्यासह नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांची प्रमुख उपस्थिती होती.

युवकांचा कृषीक्षेत्रातील सहभाग वृद्धींग व्हावा या उद्देशाने कृषीशिक्षण घेणाऱ्या व या क्षेत्रात नैपुण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा कृषीथॉन पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. गेल्या 15 वर्षांपासून हा पुरस्कार दिला जात आहे. कृषीक्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी व शेतीविषयक नवीन संकल्पना त्यांच्यापर्यंत पोहचविण्यासाठी कृषीपदवीधरांची भूमिका महत्त्वाची असते. अशा उपक्रमांतून त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो.

विदर्भात पाहिजे त्या प्रमाणात शेती तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात नाही. विदेशात मनुष्यबळ कमी असल्यामुळे रोबोटिक शेतीचा अवलंब करण्यात येतो. स्पेस फार्मिंग, टेरेस फार्मिंग, माती विना शेती अशा नवनवीन शेती पद्धतीचा अवलंब विदेशात करण्यात येत आहे. असे नवनवीन तंत्रज्ञान आपल्या विभागात कशा प्रकारे आणता येईल याकरिता कायम प्रयत्नशील राहील, असे मनोगत शुभम पिंपकर यांनी व्यक्त केले.

हे देखील वाचा: 

पाटणच्या ठाणेदार संगीता हेलोंडे यांची तडकाफडकी बदली

शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी मारेगाव तालुका काँग्रेसचे आमरण उपोषण

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.