जितेंद्र कोठारी, वणी : शहरात विविध ठिकाणी लपून छपून मटका जुगार व्यवसाय सुरु आहे. याबाबत ठाणेदार प्रदिप शिरस्कर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वणी पोलिसांनी सोमवार 19 डिसेंबर रोजी भाजी मंडी व सिंधी कॉलोनी परिसरात रेड करून 3 जणांना मटकापट्टी जुगार खेळवतांना अटक केली आहे.
भाजी मंडी परिसरात सुलभ शौचालयाच्या बाजुला टाकलेल्या धाडीत पोलिसांनी आरोपी लक्ष्मण बापुराव झाडे (34), रा. रंगनाथ नगर वणी, महमद अहेसान मोहमद खलील (48) रा. एकता नगर, वणी यांच्या कडून वरळी मटका साहीत्य व नगदी असे 28 हजार 580 रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. सिंधी कॉलोनी येथील घनश्याम पडोळे यांचे श्रावण बारचे समोरील गल्लीत आरोपी दयाराम फल्ले यादव (47) रा. राजुर कॉलरी यास अटक करून त्यांचे जवळून वरळी मटका साहीत्य व नगदी 2 हजार 250 रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी वणी संजय पुजलवार यांचे मार्गदर्शनात व ठाणेदार पोनि प्रदिप शिरस्कर यांचे निर्देशानुसार सपोनि माधव शिंदे, सफौ भादीकर, सुहास मंदावर, हरींद्र भारती यांनी केली.
Comments are closed.