अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवले

0

वणी(रवि ढुमणे): वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भालर येथील 11 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या संबंधी मुलीच्या वडिलांनी पोलिसात केली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

तालुक्यातील भालर येथील 17 वर्षीय कुमारिका वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेत होती. त्यामुळे ती रोज वणीला येत होती. नेहमीप्रमाणे ती कॉलेजला गेली. मात्र घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी मुलीची शोधाशोध सुरू केली.

दरम्यान सदर मुलगी ही कवडशी येथील एका तरुणाच्या दुचाकीवर बसून गेल्याची माहिती त्यांना मिळाली. सदर तरुणाची माहिती घेतली असता तो अविनाश अण्णाजी बुच्चे (23)0 असल्याचे माहीत झाले. त्यावरून वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.