ज्योतिबा पोटे, मारेगाव: मारेगाव पं.स.अंतर्गत येत असलेल्या घोडदरा येथील. जि. प. शाळेमध्ये शुक्रवारी दि. २९ डिसेंबरला शिक्षकच आले नाही. त्यामुळे शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना शाळेसमोरच वर्ग भरवावा लागला. या प्रकारामुळे पं. स. शिक्षण विभागाचा गलथानपणा चव्हाट्यावर आला आहे.
घोडदरा जि.प.शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी शाळेवर एकही शिक्षक हजर नव्हते. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेबाहेरच वर्ग भरवावा लागला. या प्रकाराची शाळा समितीच्या अध्यक्षानी ह्या बाबीची लेखी तक्रार गटशिक्षण अधिकारी मारेगाव यांचे कडे केली. ते या घटनेचा संबंधितावर कोणती कारवाई करते या कडे लक्ष लागले आहे.
शाळेवर लक्ष केंद्रीत करणारे केन्द्रप्रमुख काय करत होते असा घोडदरा वासियाचा सवाल आहे. शासन शिक्षकांना पगार देऊनही जर शाळा बंद राहत असेल तर पं. स. शिक्षण विभागानी हयगय करनाऱ्या शिक्षकावर व केन्द्रप्रमुखावर कारवाई करनार का? असा सवाल पालकांचा आहे.