दोन वर्षांनंतर कैदी पुन्हा परतला जेलमध्ये… फरार कैद्याला वणीतून अटक

जितेंद्र कोठारी, वणी: दोन वर्षांआधी पॅरोलवर जेलमधून बाहेर निघून फरार झालेला कैदी पुन्हा गजाआड झाला आहे. दीपक यशवंत पुणेकर असे कैद्याचे नाव असून मंगळवारी रात्री वणीतील छोरिया ले आऊट येथून त्याला अटक करण्यात आली. दोन वर्षांआधी नागपूर येथील कारागृहातून तो पॅरोलवर जेल बाहेर आला होता. मात्र संचित अभिवचन रजा संपल्यानंतरही तो कारागृहात परत गेला नव्हता. अखेर स्थानिक गुन्हे शाखेने या कैद्यावर कारवाई करून त्याची रवानगी पुन्हा जेलमध्ये केली आहे.

दीपक पुणेकर हा राजूरा येथील रहिवासी आहे. त्याच्यावर राजूरा येथे भादंविच्या कलम 224 नुसार गुन्ह्याची नोंद होती. पुढे त्याची रवानगी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. कोरोना काळात सरकारद्वारा आकस्मीक संचित अभिवचन रजेची (पॅरोल) सवलत कैद्यांना देण्यात आली होती. याचा फायदा घेऊन दीपक हा कारागृहाबाहेर आला होता. मात्र रजा संपल्यानंतर तो पुन्हा कारागृहात परतला नाही. अखेर त्याला कारागृह प्रशासनाने फरार घोषीत करण्यात आले होते.

तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर हा कैदी वणीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलीस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी कैदाला तात्काळ अटक करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. स्थानिक गुन्हा शाखेने माहिती काढली असता सदर कैदी हा छोरिया ले आऊट येथे असल्याची माहिती मिळाली. अखेर खबर पक्की असल्याचे लक्षात आल्यावर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने मंगळवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी रात्री छोरीया ले आऊट येथील कैदी राहत असलेल्या घरी धाड टाकली व फरार कैद्याला अटक केली.

कैदी दीपक पुणेकरला पुढील कारवाई साठी पो.स्टे. राजुरा जि. चंद्रपुर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात सपोनि/ अमोल मुडे, पोउपनि/ योगेश रंधे, पोहवा/ योगेश डगवार, सुनिल खंडागळे, पोना/ सुधिर पांडे, सुधिर पिदुरकर, निलेश निमकर, पोकॉ/ रजनिकांत मडावी, चापोना/ सतिश फुके यांनी पार पाडली.

हे देखील वाचा: 

वणीतील तरुणाचा मुंबई पुणे हायवेवर अपघात

Comments are closed.