मारेगावात कडकडीत बंद

कोरेगाव भिमा घटनेचा विविध संघटनेकडून निषेध

0

ज्योतिबा पोटे, मारेगाव: भिमा कोरेगाव येथे द्विशताब्दी वर्ष पूर्ति निमित्य गेलेल्या लाखो भीम सैनिकावर केलेल्या भ्याड हल्ला प्रकारणाच्या निषेधार्थ मारेगाव शहर 100% बंद ठेवण्यात आले. या बंदमध्ये शहरातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

पुर्वजना मानवंदना देण्या करीता भिमा कोरेगाव येथे गेलेल्या भिमसैनिकांवर मनुवादी संघटनांनी नियोजन पुर्व षडयंत्र रचून लाखो भीम अनुयायांवर दगड फेक व मारहाण करून शेकडो वाहनांची तोड़फोड़ करुन जाळल्यात आले होते. या हल्ल्यात अनेक जखमी झाले.

या घटनेच्या पडसात अवघ्या देशासह मारेगाव शहरात सुद्धा पडले. या घटनेच्या निषेधार्थ मारेगावातील सर्व संघटनेच्या वतीने बंद पाळण्यात आला. मारेगाव बंद साठी भारिप, मराठासेवा संघ, भाकप व आदी सामाजिक संघटना सहभागी झाल्या. शहरातील व्यापा-यांनी सहकार्याने मारेगाव बंदला उत्फुर्त प्रतिसाद दिला. यामधे भारिपच्या कार्यकर्त्यासह शेकडो शहरातील नागरीक व विविध संघटनेचे लोक सहभागी झाले होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Leave A Reply

Your email address will not be published.