आमदारांच्या हस्ते सेव्हन स्टारच्या नवीन शाखेचे व झिशान डेव्हलपर्सच्या कार्यालयाचे उद्घाटन

विवेक तोटेवार, वणी: 19 एप्रिल रोजी वणीतील शेवाळकर परिसर येथे परिसरातील सुप्रसिद्ध सेवन स्टारची नवीन शाखा उघडण्यात आली. या शाखेचे व ब्राह्मणी रोड येथे झिशान डेव्हलपर्सच्या कार्यालयाचे आमदार संजीवरेड्डी बोडकुरवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी उपस्थिती होती.

Podar School 2025

बुधवारी दिनांक 19 एप्रिल रोजी सेवन स्टार कॉफी अँड शेकचे उद्घाटन करण्यात आले. या कॉफी व शेक स्टोअरचे प्रमुख आकर्षण कॉफी मशीन आहे. या ठिकाणी ग्राहकांना विविध प्रकारच्या कॉफी तसेच आईस्क्रीम, थिक शेक, ज्युसेस इ सह स्नॅक्सचा आनंद घेता येणार आहे. उद्घाटन प्रसंगी बोलताना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी सेवन स्टारची फूड चैन अशीच वाढत राहो अशा शुभेच्छा दिल्या.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

मान्यवरांच्या उपस्थितीत झिशान डेव्हलपर्सचे उद्घाटन
ब्राह्मणी रोड येथे झिशान डेव्हलपर्स या रिअल इस्टेट मध्ये कार्यरत संस्थेच्या कार्यालयाचे शुक्रवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, संजय देरकर, फारुख चिनी, जमीर खान, जावेद शेख, सौद भाई, शाहिद, मुन्नाजी, इमरान, इकबाल शेख, हुसेन शेख, निसार हाजी उपस्थित होते.

Comments are closed.