उकणीमध्ये कबड्डीचे भव्य खुले सामने

5 जानेवारीला होणार स्पर्धेचे उद्घाटन

0

वणी: न्यू फ्रेंड्स क्रीडा मंडळ उकणी यांच्या वतीने शुक्रवारी दिनांक 5 जानेवारीपासून कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे. संध्याकाळी 5 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. जि. प. सदस्य विजय पिदुरकर असणार आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

उकणी बस स्टॉप जवळील मैदानात दोन दिवस ही स्पर्धा रंगणार असून यात बक्षिसांची मोठ्या प्रमाणात लूट आहे. यात प्रथम बक्षीस 25000, द्वितीय बक्षीस 15000, तृतीय बक्षीस 10000, चतुर्थ बक्षीस 5000 रुपये आहे. सोबतच इतर वैयक्तिक बक्षीस देखील यात ठेवण्यात आले आहे.

या भव्य स्पर्धेचा आनंद सर्व कबड्डी प्रेमींनी घ्यावा असे आवाहन न्यू फ्रेंड्स क्रीड़ा मंडळ उकणी चे अध्यक्ष समित गानफाडे व सचिव उत्तम पाचभाई आणि सदस्यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंडळाचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ परिश्रम घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.