आजीच्या भेटीला आलेली अल्पवयीन मुलगी घरून बेपत्ता

जितेंद्र कोठारी, वणी: उन्हाळी सुट्ट्यामध्ये आजोळी आलेली अल्पवयीन मुलगी दुसऱ्याच दिवशी घरून बेपत्ता झाली. याबाबत मुलीचे आजोबा (आईचे वडील) यांनी वणी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. तक्रारीवरून वणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

सदर कुमारिका दि. 6 मे रोजी शहरालगत असलेल्या गावात मामाच्या घरी आली होती. दिनांक 7 मे रोजी सकाळी 8 वा. वाहन चालक असलेले मुलीचे आजोबा ड्युटीवर गेले. तर आजी आणि मामा कामानिमित्त घराबाहेर गेले. दरम्यान मुलगी घरात एकटीच होती.

सकाळी 10.30 वाजता आजोबा घरी आले असता त्यांना नात दिसून आली नाही. आजूबाजूच्या घरात विचारपूस केली असता ती कुठंही मिळून आली नाही. त्यानंतर मुलीच्या आई वडील व नातेवाईकांकडे विचारणा केली मात्र तिचा पत्ता लागला नाही.

अखेर बेपत्ता मुलीचे आजोबा यांनी त्यांची अल्पवयीन नात कुणालाही न सांगता घरून बेपत्ता झाल्याची तक्रार वणी पोलिस ठाण्यात नोंदवली. मुलगी अज्ञान असल्यामुळे कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलीला फुस लावून पळवून नेल्याची नोंद करीत. भादंविच्या कलम 363 अनव्ये गुन्हा दाखल केला.

अल्पवयीन मुली पळून जाण्याच्या घटनेत वाढ
अल्पवयीन मुलींचे घरून बेपत्ता होण्याचे प्रमाण तालुक्यात चांगलेच वाढले आहे. अल्पवयीन मुलींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना फूस लावून पळवले जात आहे. आई वडिलांचा विश्वास धुळीस मिळवून त्यांच्या न कळत अल्पवयीन मुली घरून पलायन करू लागल्या आहे. शिक्षण घेण्याच्या वयात भूलथापांना बळी पडून चुकीच्या मार्गाकडे वळू लागल्या आहे विशेष म्हणजे खेड्यातील व गरीब घरातील मुली घरून पळून जाण्याच्या घटना अधिक आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.