ACB Trap News : लाच घेताना नगर परिषद आरोग्य निरीक्षकासह दोन अभियंता अॅंटी करप्शनच्या जाळ्यात

जितेंद्र कोठारी, वणी : बिल काढून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या नगर परिषद आरोग्य निरीक्षक सह दोघांना अॅंटी करप्शन विभागाचे अधिकाऱ्यानी लाच घेताना रंगेहात पकडले. यवतमाळ रोडवरील गजानन भोजनालय मध्ये मंगळवार 1 अगस्ट रोजी दुपारी 2.30 वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळच्या अधिकाऱ्यानी ही कारवाई केली. नगर परिषद आरोग्य निरीक्षक जय उंटवाल, पानी पुरवठा अभियंता शुभम तायडे व कंत्राटी अभियंता मयूर मुंडाने असे अटक करण्यात आलेले अधिकाऱ्यांचे नाव आहे.

तक्रारदार हा वणी नगर परिषद अंतर्गत कंत्राटदार असून त्याचे थकीत बिल काढण्यासाठी आरोग्य निरीक्षक जय उंटवाल हा सतत पैसेची मागणी करीत होता. तक्रारदार यांना लाच देण्याची मानसिक इच्छा नसल्यामुळे त्यांनी यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दिनांक 1 आगस्ट तक्रारदार यांनी आरोग्य निरीक्षक जय उंटवाल यांना फोन करून पैसे देतो अशी बतावणी केली. तेव्हा आरोपी आरोग्य निरीक्षक यांनी मी जेवण करायला गजानन भोजनालयमध्ये जात आहे. तुम्ही पैसे घेऊन तिथेच या असे सांगितले.

तक्रारदार यांनी लगेच अॅंटी करप्शनचे पोलिस निरीक्षक यांना फोन करून माहिती दिली. त्यानुसार पोलिस कर्मचाऱ्यानी सादया ड्रेसमध्ये भोजनालय परिसरात सापळा रचला. दुपारी 2.30 वाजता दरम्यान तक्रारदार यांनी गजानन भोजनालय मध्ये जाऊन आरोग्य निरीक्षक उंटवाल यास मागणी प्रमाणे लाचेची रक्कम दिली. त्यावेळी नगर परिषद पानी पुरवठा अभियंता शुभम तायडे व कंत्राटी अभियंता मयूर मुंडाने सुद्धा तिथे हजर होते. तक्रारदार यांनी इशारा करताच भोजनालयाच्या खाली उभे असलेले एसीबी अधिकाऱ्यानी तिसऱ्या मजल्यावर येऊन धाड टाकली. परंतु अॅंटी करप्शनची रेड झाल्याचे लक्षात येताच आरोपी जय उंटवाल यांनी भोजनालयच्या बाथरूममध्ये पैसे लपवून ठेवले. एसीबी अधिकाऱ्यानी आरोपीला विचारपूस करून बाथरूम मधून लाचेची रक्कम जप्त केली.

अॅंटी करप्शन अधिकाऱ्यानी आरोग्य निरीक्षक जय उंटवाल, अभियंता शुभम तायडे व कंत्राटी अभियंता मयूर मुंडाने या तिघांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी सोबत नेल्याची माहिती आहे. सदर कारवाई यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.