घरात घुसून दोन विवाहित महिलांचा विनयभंग

जितेंद्र कोठारी, वणी : घरात घुसून दोन विवाहित महिलांचा विनयभंग केल्याची घटना तालुक्यातील वणी व राजूर (कॉलरी) येथे घडली. पिडीत महिलांच्या फिर्याद वरून वणी पोलिसांनी दोन्ही आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करुन एका आरोपीला तात्काळ अटक केली. दीपक भुसारी, रा. दांडगाव, ता. मारेगाव व वैभव उर्फ दत्ता नागोजी तितुरकर रा. राजूर (कॉलरी) ता. वणी असे आरोपीचे नाव आहे. 

पहिल्या घटनेत वणी येथील विवाहित महिला आपल्या मैत्रिणी सोबत मागील 8 ते 10 दिवसांपासून पायी फिरायला जात असताना आरोपी हा सारखा तिच्याकडे पाहत होता. एका दिवशी आरोपी यांनी फिर्यादी हिला रस्त्यात अडवून मला तुमच्याशी बोलायचं आहे, मैत्री करायची आहे असं महणाला. त्यावर फिर्यादी महिलेने त्यास नकार दिला. परंतु आरोपी हा 3 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता दुचाकीने विवाहित महिलेच्या घरी पोहचला व वाईट उद्देशाने तिचा पकडला. पिडीत महिलेच्या फिर्याद वरुन वणी पोलिसांनी आरोपी दीपक भुसारी, रा. दांडगाव, ता. मारेगाव विरुध्द 452, 354, 354 (ड) नुसार गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या घटनेत 3 ऑगस्ट रोजी राजूर (कॉलरी) येथे फिर्यादी महिला सायंकाळी 7 वाजता दरम्यान कामावरून घरी परत आली असता आरोपी हा तिच्याकडे सतत वाईट नजरेने बघत घरासमोरून चकरा मारत होता. रात्री 10 वाजता सुमारास महिला झोपून असताना आरोपी यांनी दार वाजवला. फिर्यादी हिने दार उघडुन पाहिला असता आरोपी बळजबरीने घरात घुसला व तिचा हात पकडुन मला तुझ्याशी बोलायचं आहे. अस म्हणून महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याबाबत पिडीत महिलेने दुसऱ्या दिवशी वणी पोलीस ठाण्यात आरोपी विरुध्द तक्रार दिली. पोलिसांनी आरोपी दत्ता नागोजी तितुरकर रा. राजूर (कॉलरी) विरुध्द 452, 354, 354 (ड) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. दोन्ही घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात एएसआय जगदीश बोरनारे व एएसआय प्रभाकर कांबळे करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.