वर्धा नदीत पोहायला गेलेले दोघे गेले वाहून

जितेंद्र कोठारी, वणी : वणी पोलीस स्टेशनच्या हद्दीत नायगाव (खुर्द) येथील जावयासह दोघे वर्धा नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना मंगळवार सायंकाळी 4.30 वाजता दरम्यान उघडकीस आली. प्रवीण सोमुलकर (35), रा. चंद्रपूर व दिलीप कोसुरकर (55) रा.नायगाव असे वाहून गेलेल्या व्यक्तीची नावे आहे. घटनेची माहिती मिळताच वणी पोलीस घटनास्थळी पोहचले व नदी पात्रात शोध मोहीम सुरु केली.

Podar School 2025

प्राप्त माहितीनुसार वणी वरोरा मार्गावर नायगाव (खुर्द) येथून विशाल कुराकर, विजय उईके, स्वप्नील सुरतेकर, जगदीश बावणे, प्रवीण सोमलकर व दिलीप कोसुरकर हे 6 जण मंगळवारी दुपारी मौजमस्ती व पोहण्याच्या उद्देशाने वर्धा नदीवर गेले होते. पोहण्यासाठी नदी पात्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने प्रवीण सोमलकर व दिलीप कोसुरकर हे दोघे पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले. वाहून गेलेला प्रवीण सोमलकर हा चंद्रपूर येथील रहिवासी असून नुकताच नायगाव येथे सासुरवाडीला आला होता. 

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

घटनेबाबत माहिती मिळताच ठाणेदार अजित जाधव पोलीस स्टाफसह घटनास्थळी पोहचले. गावकऱ्यांच्या मदतीने नदी पात्रात शोध मोहीम सुरु केली असून अद्याप दोघांपैकी कुणाचाही पत्ता लागला नाही.

Comments are closed.