घरफोडी व दुचाकी चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना अटक

जितेंद्र कोठारी, वणी : दुचाकी चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना वणी पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यातून अटक केली आहे. गणेश प्रल्हाद आडे (32) रा. हनुमान नगर, भद्रावती तसेच सचिन उर्फ बादशा संतोष नगराळे (26) रा. सोमनाथ वार्ड, राजुरा जि. चंद्रपूर असे अटक करण्यात आलेले आरोपीचे नाव आहे.

Podar School 2025

येथील बस स्थानक परिसरातून मोटरसायकल क्रमांक MH 29 AX 4023 अज्ञात आरोपीने लंपास केल्याची तक्रार पांढरकवडा येथील मो. जलील अ. हमीद शेख यांनी 28 सप्टे. 2020 रोजी वणी पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली होती. सदर गुन्ह्यातील आरोपी गणेश प्रल्हाद आडे यास तब्बल 3 वर्षानंतर वणी पोलिसांनी भद्रावती जिल्हा चंद्रपूर येथून अटक करून त्याच्या कडून चोरी केलेली मोटरसायकल जप्त केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

फिर्यादी अनिता चंद्रवदन कुमरे, रा. भोंगळे ले आऊट वणी हिने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून सोन्याच्या दागिन्यांसह 44 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची तक्रार 23 ऑगस्ट 2023 रोजी वणी पो. स्टे. येथे दिली. तपासादरम्यान आरोपीची माहिती काढून वणी पोलिसांनी राजुरा जि. चंद्रपूर येथील आरोपी सचिन उर्फ बादशा संतोष नगराळे याला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला.

सदर दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना वणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 31 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदर कार्यवाही जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, उप विभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुदाम आसोरे, एएसआय सुदर्शन वानोळे, हेड कॉन्स्टेबल सुहास मंदावार, हरिंद्रकुमार भारती, पंकज उंबरकर, विशाल गेडाम, गजानन कुडमेथे यांनी केली.

Comments are closed.