मोठ्या प्रतिक्षेनंतर वणी शहरात बरसला मुसळधार पाऊस

पुरुषोत्तम नवघरे, वणी: अनेक दिवसांपासून पासून दडी टाकून बसलेला पावसाला पुन्हा सुरवात झाली आहे. दोन दिवसांपासून रिमझिम सरी पडत असताना आज दुपारी 2 च्या सुमारास मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात आलेला उकाडा काही प्रमाणात कमी झाला आहे. तर काही दिवसांपासून पाऊसाच्या प्रतिक्षेत असलेला बळीराजा पावसामुळे सुखावला आहे. दरम्यान परिसरात वीज कोसळल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिक सुकण्यास सुरुवात झाली होती. मात्र शनिवारपासून रिमझिम पावसाला सुरूवात झाली. मात्र आज दुपारी अचानक आकाशात काळे ढग संचारले व मेघगर्जनेसह मुसळधार पावसाला सुरूवात झाली. दरम्यान मारेगाव तालुक्यात गोरज फाट्यावर वीज कोसळून एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर शनिवारी मेंढोली येथे वीज कोसळून सालगड्याचा तर उमरी येथील सतीश बापूजी तिखट यांच्या गोठ्यावर वीज कोसळून तीन वर्षाच्या गो-ह्याचा मृत्यू झाला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.