शिरपूरजवळ भरधाव ट्रकची मालवाहूला धडक

चालक गंभीर जखमी, ट्रकचालक फरार

विवेक तोटेवार, वणी: एका भरधाव ट्रकने एका अॅपेला जबर धडक दिली. शिरपूर जवळ हा अपघात झाला. या धडकेत अँपे चालक गंभीर जखमी झाला. रविवार 24 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. विनोद मोहाडे (35) असे गंभीर जखमी झालेल्या चालकाचे नाव असून तो मंदर येथील रहिवासी आहे.

Podar School 2025

विनोद मोहाडे हा आपला मालवाहक अँपे क्रमांक (MH 29 BD 2263) ने किराणा गावोगावी फिरून विकतो. रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे विनोद हा माल विकून मंदर येथे परत जात होता. दरम्यान दुपारी 1 वाजताच्या सुमारास शिरपूर ते चारगाव रस्त्यावर विरुद्ध दिशेने येणारा ट्रक (RJ 23 TR 3898) चा मागचा टायर फुटला.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

यामुळे चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटले व ट्रकने अँपेला धडक दिली.धडक बसताच ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला. सदर ट्रक हा मुंगोली येथे कोळसा भरण्यासाठी जात असल्याची माहिती आहे. या धडकेत अँपे मधील माल अस्ताव्यस्त फेकल्या गेला.

विनोदला डोक्याला मार असल्याने त्याला सुरवातीला वणीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती आहे. घटनेचा तपास शिरपूर पोलीस करीत आहे.

Comments are closed.