विवेक तोटेवार, वणी: चिखलगाव जवळील वणी-वरोरा बायपासजवळ रात्री एक ट्रक पलटी झाला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला. फिरोज खान (40) रा. बोरी अरब असे जखमी ट्रक चालकाचे नाव आहे. सदर ट्रक हा जैन ट्रान्सपोर्टचा असल्याची माहिती आहे. मंगळवारी दिनांक 3 ऑक्टोबरच्या रात्री उशिरा ट्रक चालक फिरोज हा मुकुटबन येथील सिमेन्ट कंपनीतून ट्रकमध्ये (MH34 BG4309) सिमेंट भरून खामगावला जात होता. रात्री 12 वाजताच्या सुमारास चिखलगाव जवळील वणी-वरोरा बायपास जवळ येथे ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक पलटी झाला. यात चालकाच्या डोक्याला व हाताला मार लागला. चालकाला डुलकी आल्याने अपघात झाल्याचे बोलले जात आहे. अपघात झाल्याचे लक्षात येताच काही लोकांनी चालकाला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. चालकाची प्रकृती धोक्याबाहेर असून चालकावर वणीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
निकेश जिलठे - संपादक वणी बहुगुणी
2007 पासूून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. ग्रामीण व शहरी असा पत्रकारितेचा अनुभव. आजतक, झी, जय महाराष्ट्र, टीव्ही 9 इत्यादी आघाडीच्या टीव्ही मीडियात मुंबई येथे विविध पदावर 10 वर्ष कार्यरत. सध्या एका पीआर एजन्सीचे संचालक तसेच वणी बहुगुणी या वेबसाईटचे मुख्य संपादक. यवतमाळ जिल्ह्यातील पहिले न्यूज पोर्टल वणी बहुगुणी या स्थानिक न्यूज पोर्टलच्या माध्यमातून परिसरातील ज्येष्ठ व नव्या दमाच्या पत्रकारांसह वणी व परिसरातील बातम्या व ताज्या घडामोडी पोहोचवण्याचा एक प्रयत्न. सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक विषयावर विविध माध्यमात लिखाण. राज्यातील अनेक ज्येष्ठ नेते व मंत्री यांचे मीडिया कन्सलटन्ट म्हणूनही कार्य.
Prev Post
Comments are closed.