दिवाळीत नातेवाईकाच्या गावाला आलेली अल्पवयीन मुलगी बेपत्ता

कार्यक्रमाला गेलेली मुलगी घरी परतलीच नाही, फूस लावून पळवून नेल्याची तक्रार

बहुगुणी डेस्क, वणी: घरून कार्यक्रम पाहायला गेलेली एक अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. तालुक्यातील राजूर कॉलरी येथे ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन मुलगी ही 13 वर्ष 1 महिन्याची असून ती तालुक्यातील एका गावात राहते. ती दिवाळीच्या सुट्टीत राजूर कॉलरी येथे एका आपल्या नातेवाईकाकडे पालकांसह आली होती. गुरुवारी दिनांक 16 नोव्हेंबर रोजी दुपारी ती आपल्या पालकांसह व नातेवाईकांसह एका कार्यक्रमाला गेली होती. रात्री 8 वाजता कार्यक्रम संपल्यावर इतर सर्व घरी आले. मात्र मुलगी घरी परतली नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांनी व नातेवाईकांनी मुलीचा गावात शोध घेतला. तसेच नातेवाईकांना फोन करून विचारणा केली. मात्र मुलीचा पत्ता लागला नाही. त्यांना मुलीला कुणीतरी फूस लावून पळवून नेल्याचा संशय आला. अखेर मुलीचे नातेवाईक व पालकांनी वणी पोलीस स्टेशन गाठत याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात भादंविच्या कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार अजीत जाधव यांच्या मार्गदर्शनात पोउनि माया चाटसे करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.