शुल्लक कारणावरून महिलेला लाकडी दांड्याने मारहाण

भीमनगर येथील घटना, आरोपी पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल

विवेक तोटेवार, वणी: शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून एकाने महिलेला कु-हाडीच्या दांड्याने मारहाण केली. शहरातील भीमनगर परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी आरोपी पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Podar School 2025

फिर्यादी शैलजा श्यामराव घुमे ह्या आपल्या पतीसोबत भीमनगर येथे राहतात. 13 डिसेंबर रोजी शेजारी राहणारे मंगल परशुराम मेश्राम हे शैलजा यांच्या घराजवळील रस्त्यावर खुटे गाडत होते. यावेळी शैलजा यांनी मंगल याला विचारणा केली असता त्याने कुऱ्हाडीच्या लाकडी दांढ्याने शैलजा यांना मारहाण केली.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

या मारहाणीत मंगल ची पत्नी चंद्रकला यांनीही मंगल याची साथ दिली व शिवीगाळ केली. या मारहाणीत शैलजा यांच्या गालावर दांडा लागल्याने त्यांना जखम झाली. दरम्यान शैलजा यांचे पती मध्ये आले असता त्यांना देखील धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

शैलजा यांच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी मंगल मेश्राम व चंद्रकला मेश्राम विरोधात भादंविच्या कलम 324, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वणी पोलीस करीत आहे.

हे देखील वाचा:

Comments are closed.