सळाख बांधताना विजेचा धक्का लागून तरुण मजुराचा मृत्यू

सळाखीचा जिवंत तारांना स्पर्श... परिसरात हळहळ

बहुगुणी डेस्क, वणी: स्लॅबचे काम सुरू असताना जिवंत ताराला स्पर्श होऊन एका तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवारी संध्याकाळी 6 वाजताच्या सुमारास मारेगाव येथे ही घटना घडली. प्रफुल्ल विठ्ठल तिवाडे (29) असे मृतकाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सविस्तर वृत्त असे की वाहिद शेख हे मारेगाव येथील वार्ड क्रमांक 6 येथील रहिवासी आहे. त्यांच्या घरी सध्या संडास, बाथरुमचे काम सुरु आहे. शनिवारी स्लॅबच्या पूर्व तयारीचे काम सुरू होते. त्यासाठी प्रफुल्ल विठ्ठल तिवाडे (29) रा. मांगरुळ ता. मारेगाव हा भिंतीवर चढून सळाख टाकण्याचे काम करीत होता.

या संडास बाथरुमच्या वरून एक 11 केव्हीची जिवंत तार गेली होती. सळाख टाकताना प्रफुल्लच्या हाती असलेल्या सळाखीचा या जिवंत तारांना स्पर्श झाला. त्यात प्रफुल्लचा जागीच मृत्यू झाला. प्रफुल्ल हा मुळचा दहेगाव येथील रहिवासी होता. तो काही महिन्याआधीच त्याच्या पत्नी व मुलामुलीसह काकाकडे मांगरुळ येथे राहायला आला होता. परिसरात मिस्त्री काम करून उदरनिर्वाह करायचा.

प्रफुल्ल याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी, लहान भाऊ असा आप्त परिवार आहे. परिसरात प्रफुल्लची एक कष्टाळू, सुस्वभावी अशी ओळख होती. त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

गुजरात येथील बनावट डिझेल वणीत ! 21 लाखांचे बनावट डिझेल जप्त

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.