आज गणेशपूर (वणी) येथे सावित्री उत्सव

संध्याकाळी 6 वाजता जाहीर प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन

पुरुषोत्तम नवघरे, वणी: क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी दिनांक 3 जानेवारीला गणेशपूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता या उत्सवाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर सुजाता गुरनुले, पांढरकवडा व अभइषा गहुकार, वणी यांच्ये व्याख्यान झाले. यात त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य व आजची जबाबदारी या विषयावर आपले विचार व्यक्त केले. संध्याकाळी 6 वाजता क्रांती काळे, साखरी जिल्हा अमरावीत यांचे समाज प्रबोधनपर जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. हे सर्व कार्यक्रम ग्रामपंचायत समोरील मैदान, गणेशपूर येथे होत आहे.

सकाळी ९.३० वा. छत्रपती स्मारक येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यात वेशभूषा स्पर्धा आयोजित कऱण्यात आली होती. गुणवंत पचारे यांची संत गाडगेबाबाची वेशभूषा या मिरवणुकीत प्रमुख आकरषण ठरले. गावातील प्रमुख मार्गाने ही मिरवणूक निघून याची ग्रामपंचायत समोरील मैदानात याची सांगता झाली. दु. 11.30 वाजता महिला मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.

उद्घाटन समारंभानंतर युवा व्याख्याता सुजाता गुरनुले, कु. अमीषा गहूकार यांचे व्याख्यान पार पडले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांचे कार्य व आजची जबाबदारी या विषयावर आपले विचार व्यक्त केले. संध्याकाळी 6 वाजता क्रांती काळे, साखरी जिल्हा अमरावीत यांचे समाज प्रबोधनपर जाहीर कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानाला मोठ्या संख्येने हजेरी लावावी असे आवाहन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला समारोह समिती, सन्मान स्त्रीशक्ती फाऊंडेशन, गणेशपूर छत्रपती महोत्सव समिती व मित्र परिवार गणेशपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.