आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी

वणी बहुगुणी डेस्क: आज शहातील आदर्श प्रशासकीय महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष संचालक रवींद्र गौरकर, सचिव – पुरुषोत्तम नवघरे, उपाध्यक्षा – उज्वला रोगे, प्राचार्य – निशांत खोब्रागडे यांची प्रमुख उपस्थिती होती मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल झाडे यांनी केले. यावेळी किशन किनाके, अमित काळे, रंजना भंडारवार, प्रणाली पत्रिवार, रुपेश आलम, प्राची मोहितकर आदी शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Comments are closed.