गोडगाव व घोन्सा शो-डील तालुका स्तरावर पात्र

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेत गोडगाव शाळा सलग दुस-यांदा चॅम्पियन

वणी बहुगुणी डेस्क: वणी पंचायत समिती अंतर्गत कायर केंद्रातील केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धा गोपालपूर येथे पार पडली. या उद्घाटनाच्या दिवशी केंद्रातील 11 शो ड्रील सादर केल्या गेल्या. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोडगाव येथील वि्दयार्थ्यांनी सादर केलेली शो ड्रीलने प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर रासा केंद्राच्या शो ड्रीलमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळा घोन्सा प्रथम ठरली. यात 14 शाळांनी सहभाग घेतला होता. कोरबी येथेी ही केंद्रस्तरीय स्पर्धा पार पडली. प्रथम क्रमाकाच्या दोन्ही शो-ड्रील तालुका स्तरावर पात्र झाल्या आहेत.

कायर केंद्रात गोपालपूर येथे झालेल्या शो-ड्रीलमध्ये द्वितीय क्रमांक जिल्हा परिषद कायर आणि तिसरा क्रमांक जिल्हा परिषद शाळा परसोडाला मिळाला. तर कोरंबी येथे झालेल्या शो-ड्रीलमध्ये दुसरा क्रमांक जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा दहेगाव तर तिसरा क्रमांक रासा येथील जिल्हा परिषद शाळेने पटकावला.

स्पर्धेत गोडगाव शाळा ठरली चॅम्पियन
गोपालपूर येथे झालेल्या क्रीडा स्पर्धेत सर्व सामन्यांमध्ये विजय मिळवत गोडगाव शाळा चॅम्पियन ठरली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सौदापूर येथे झालेल्या स्पर्धेत देखील गोडगाव शाळा चॅम्पियन ठरली. वयोगट 6-11 आणि 11-14 यागटात सांघिक आणि वैयक्तिक विभागात सर्वात जास्त विजेत्यांना चॅम्पियन घोषीत केले जाते.

शाळेचे मुख्याध्यापक संतोष आसुटकर यांच्या मार्गदर्शनात व शिक्षक ईश्वर राउत यांच्या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांनी हे यश मिळवले आहे. निकाल घोषीत झाल्यानंतर गावक-यांनी वाजत गाजत सर्व खेळाडुंची मिरवणूक काढली. यावेळी खेळाडुंना खाउ वाटप करण्यात आले. यावेळी शाळा समिती तर्फे विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

Comments are closed.