शेतक-यांच्या विविध प्रश्नांवर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांना निवेदन
काँग्रेस कमिटीतर्फे डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्त्वात निवेदन, परिसरातील समस्येवर चर्चा
पुरुषोत्तम नवघरे, वणी: महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धंनजय मुंडे यांचे बुधवारी दिनांक 3 जानेवारी रोजी वणीला आगमन झाले. यावेळी काँग्रेस कमिटीने त्यांची भेट घेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत त्यांना निवेदन दिले. शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यात यावा, पुरबुडी, ओल्या दुष्काळा मुळे नष्ट झालेल्या पिकाची नुकसानभरपाई, दिवसाला रोज 10 तास वीज मिळावी, कापसाला 12 हजार रु प्रति क्विंटल भाव, सोयाबीनला 8 हजार, तुरीला 13 हजार रु आधारभूत किंमतीच्या दीडपट भाव देण्यात यावा, जंगली जनावरांचा बंदोबस्त करण्याकरिता तारकुंपणाला सरसकट अनुदान देण्यात यावे इत्यादी मागण्यांचा उल्लेख निवेदनात आहे. डॉ महेंद्र लोढा यांच्या निवासस्थानी बुधवारी संध्याकाळी धनंजय मुंडे यांनी भेट दिली. दरम्यान वणी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे धनंजय मुंडे यांचे स्वागत करत परिसरातील प्रश्नांवर चर्चा केली. सदर निवेदन डॉ महेंद्र लोढा यांचे नेतृत्वात देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते जयशिंग पा गोहोकार, वणी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष घनश्याम पावडे, राकेश खुराणा, वसंत जिनिंगचे उपाध्यक्ष जय भाऊ आबड, अशोक पांडे तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
Comments are closed.