कबड्डी पाहण्यास गेलेल्या व्यक्तीला सेंट्रींग ठोकण्याच्या हातोडीने मारहाण

भालर येथील घटना, मारहाणीत फिर्यादी जखमी...

वणी बहुगुणी डेस्क: कबड्डी सामने पाहायला गेलेल्या एका व्यक्तीला गावातीलच एका तरुणाने हातोडीने मारहाण केली. भालर येथे शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. राजू प्रभाकर बोबडे (38) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू प्रभाकर बोबडे (38) हा भालर येथील रहिवासी आहे. तो मजुरी करतो. सध्या भालर येथील सिताईनगरी येथे कबड्डी तुर्नामेंट सुरू आहे. रात्री 10 वाजताच्या सुमारास राजू जेवण करून कबड्डी तुर्नामेंट पाहायला गेला होता. तिथे गावातीलच मंगेश (19) हा तरुण उभा होता. मंगेश नेहमी राजूला दारूच्या नशेत शिविगाळ करतो व मारण्याची धमकी देतो. असा राजूचा आरोप आहे.

सामने बघताना आरोपी मंगेशने राजूला शिविगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावर राजूने हटकले असता मंगेशने सेंट्रींग ठोकण्याच्या हातोडीने राजूच्या डोक्यावर प्रहार केला. यात राजूच्या डोक्याला जबर इजा होऊन त्याच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. आरडाओरड पाहून आजूबाजूला असलेले राजूचे मित्र घटनास्थळी आले. त्यामुळे आरोपीने तिथून पळ काढला.

मारहाण झाल्याने राजूने वणी पोलीस स्टेशन गाठत आरोपी मंगेश विरोधात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी मंगेशविरोधा भादंविच्या कलम 324 व 504 नुसार गुन्हा दाखल केला. प्रकरणाचा तपास वणी पोलीस करीत आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

हे देखील वाचा: 

नोकरी आणि पैशावर दावा करणा-या तोतया पत्नीवर गुन्हा दाखल

भरधाव ट्रकने चिरडले महिलेला, महिलेचा जागीच मृत्यू

Comments are closed.