पुरुषोत्तम नवघरे, वणी: यवतमाळ जिल्हा मागासलेला आहे. त्यातही वणी उपविभाग हा आदिवासी बहुल आहे. परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना राज्यातील तसेच देश-विदेशातील नामांकित विद्यापीठ, शिक्षण संस्था यात प्रवेश घ्यायचा असतो. मात्र त्यासाठी असलेली प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती, फेलोशीप याबाबत पुरेसी माहिती नसते. या साठी दहावी-बारावी, पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उच्चशिक्षणाचा जागर करणारी शिक्षणयात्रा काढली जाणार आहे. रविवारी दिनांक 7 जानेवारी रोजी या यात्रेला सुरुवात होणार असून 11 जानेवारी पर्यंत ही यात्रा चालणार आहे. अशी माहिती युवाशक्ती क्रांतीकारी संघटने तर्फे देण्यात आली.
शनिवार दिनांक 6 जानेवारी वसंत जिनींग हॉल येथे दुपारी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती देण्यात आली. यावेळी संदीप गोहोकार, ऍड. रुपेश ठाकरे, धीरज भोयर, राहुल खारकर यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. गणतंत्र दिनाचे औचित्य साधून सध्या चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात शिक्षण यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. याच धर्तीवर ही यात्रा असणार आहे.
शिक्षण यात्रेचे यवतमाळ जिल्यात दोन टप्पे असून पहिल्या टप्याची सुरुवात वणी उपविभागातून होत आहे. शिक्षण यात्रेत ऍड. दीपक चटप (ब्रिटीश सरकारची चेव्हनिंग शिष्यवृती प्राप्त करणारा तरुण वकील) अविनाश पोईनकर (कवी, लेखक, मुक्त पत्रकार, ग्रामीण आदिवासी क्षेत्रात कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते व मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक फेलो) व संदीप गोहोकर (शिक्षक तथा प्रतिनिधी युनिव्हर्सल युथ लीडरशिप समेट इंडोनेशिया 2023) हे यात्रे दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
ही यात्रा आपल्या परिसरातील आदर्श महाविद्यालय, वणी, श्रीमती नुसाबाई चोपणे महाविद्यालय, वणी, पब्लिक महाविद्यालय, संघ, शासकीय आय. टी. आय, सुशगंगा पॉलटेक्निक वणी, राष्ट्रीय महाविद्यालय, मारेगाव, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, मारेगाव, श्री शिवाजी महाविद्यालय, मारेगाव, आदर्श महाविद्यालय, मुकुटबन, कुणकाबाई उदुकवार महाविद्यालय, मुकुटबन, शासकीय आय. टी. आय, झरी, जि. प. शाळा, वनोजा इत्यादी ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. पत्रकार परिषदेला संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हे देखील वाचा:
कबड्डी पाहण्यास गेलेल्या व्यक्तीला सेंट्रींग ठोकण्याच्या हातोडीने मारहाण
Comments are closed.