शेतकऱ्यांचा शेतमाल चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

सोयाबिन चोरटे गजाआड, अवघ्या 24 तासात प्रकरणाचा छडा

पुरुषोत्तम नवघरे, वणी: शेतातील शेतमाल चोरणा-या एका टोळीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) ने केला आहे. या प्रकरणी वांजरी येथील 4 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 70 हजारांचा शेतमाल आणि 70 हजारांची मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अवघ्या 24 तासांच्या आत एलसीबी पथकाने सर्व चोरट्यांना जेरबंद केले.

विलास दत्तुजी देउळकर वय ५० वर्षे, रा. वांजरी ह.मू. वणी यांचे कळमना खर्दु शिवारातील शेत आहे. त्यांच्या शेतातील बंड्यात शेतमाल ठेवलेला होता. शुक्रवारी दिनांक 19 जानेवारीला दु. 4.30 वाजताच्या सुमारास त्यांना शेतातील बंड्यातून 15 क्विंटल सोयाबिन किंमत ६४,५०० रु चोरी गेल्याचे कळले. यावरून त्यांनी वणी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यावरून अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शेतमाल चोरी संबंधाने गांभीर्य लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणने करीता पथक रवाना करण्याच्या सुचना दिल्या. त्यावरून स्था.गु.शा. वणी हे प्रकरणाचा तपास करीत होते. दरम्यान त्यांना शेतातील सालगडी अनिल चव्हाण रा. बांजरी यानेच शेतातील सोयाबीन चोरले असल्याची गोपणीय माहिती प्राप्त झाली.

एलसीबी पथकाने वांजरी येथे जाऊन फिर्यादी यांचे शेतातील सालकरी अनिल नामदेव चव्हाण वय ५० वर्षे, रा. बेघर बांजरी यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चार ते पाच दिवसांपूर्वी गावातील जयेश देऊळकर, रोशन देउळकर, अतुल ढवस याच्या मदतीने विलास दत्तुजी देउळकर यांच्या शेतातील बंडयामुधुन अंदाजे २९ पोते सोयाबीन चोरले असल्याची कबुली दिली.

तसेच सोयाबीन त्याचे तिन साथीदारांनी मोटर सायकलवरुन हा माल नेऊन वणी येथे विकल्याची कबुली दिली. त्यावरून आरोपी १) अनिल नामदेव चव्हाण वय ५० वर्षे, रा. बेघर बांजरी व त्याचे साथीदार, २) रोशन तुळशीराम देउळकर वय ३० वर्षे, ३) जयेश शंकर देउळकर वय २० वर्षे, ४) अतुल उर्फ विवेक अवधुत धवस वय २९ वर्षे, सर्व रा. वांजरी यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे सोयाबीन मालाबाबत विचारपुस केली.

तपासात चोरी केलेले सोयाबिन वणी येथील १) विजय गुलाबराव निते वय ४८ वर्ष व २) चंद्रशेखर पांडुरंग देठे वय ३९ वर्षे, दोन्ही रा. चिखलगांव वणी यांनी वेगवेगळ्या दुकानदारांना विक्री केले असल्याचे दिसुन आल्याने नमुद दुकानदार यांचेकडुन अनुक्रमे १९ व १० असे २९ कट्टे अंदाजे १५ क्विटल सोयाबीन किंमत ६४,५००/ रु चे जप्त केले.

आरोपींनी गुन्हयात वापरलेल्या ०२ मोटर सायकल किमंत ७०,०००/रु असा एकुण १,३४,५०० रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी १) अनिल नामदेव चव्हाण वय ५० वर्षे, रा. बेघर वांजरी व त्याचे साथीदार, २) रोशन तुळशीराम देउळकर वय ३० वर्षे, ३) जयेश शंकर देउळकर चय २० वर्ष, ४) अतुल उर्फ विवेक अवधुत धवस वय २९ वर्षे, सर्व रा. वांजरी यांना पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. वणी यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉ. पवन बन्सोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, आधारसिंग सोनोने पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा. यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि अतुल मोहनकर, सपोनि अमोल मुडे, पोलीस अंमलदार सुनिल खंडागळे, सुधीर पांडे, योगेश डगवार, सुधीर पिदुरकर, निलेश निमकर, रजनीकांत मडावी, चापोहवा नरेश राउत सर्व स्था.गु. शा. यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.