योजना तळागाळात पोहोचवणे हेच ध्येय: मंत्री हरदीप सिंग पुरी

विविध योजनातील लाभार्थ्यांना पुरी यांच्या हस्ते चेक वाटप...

विवेक तोटेवार, वणी: भाजप सरकार ही एक लोकांच्या नजरेत एक चांगले सरकार म्हणून समोर येत आहे. सत्तेत राहून जे करायला पाहिजे तेच आम्ही करीत आहो. शासनाच्या योजना तळागाळात पोहोचवणे हेच सरकारचे ध्येय आहे, असे प्रतिपादन केंद्रिय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी केले. केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्री हरदिप सिंग पुरी यांनी आज मंगळवार 23 जानेवारी रोजी वणीला भेट दिली. विनायक मंगल कार्यालय येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकार कामगिरीची माहिती दिली. तसेच त्यांनी वणीतील एसबी लॉन येथे झालेल्या कार्यक्रमात विविध योजनेतील लाभार्थ्यांशी भेट घेऊन त्यांना चेक वाटप केले.

दुपारी 12.30 वाजता वणीतील एस बी लॉन येथे ‘मेरी कहाणी मेरी जुबानी’ व संकल्प यात्रा उदघाटन कार्यक्रमाला हरदीप सिंग पुरी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी दिनदयाल उपख्याय अंतोदय योजना, स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना या योजनेतील लाभार्थ्यांना धनादेश वाटप केले. व उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना सिलेंडर वाटप केले. सोबतच लाभार्त्याशी जवळीक साधत विचारपूस केली. या कार्यक्रमात जवळपास 1800 ते 2000 लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. शिवाय आपल्या देशाशी एकनिष्ठ राहण्याची सामूहिक शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला वणी शहर व ग्रामीण भागातील लाभार्थी उपस्थित होते.

दु. 1.30 वाजता वणीतील मुकुटबन रोडवरील विनायक मंगल कार्यालय येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नोव्हेंबर महिन्यात या योजनांची सुरवात झाली. या योजनांमुळे सरकारी अधिजारी हे लोकांपर्यंत जात आहे. अगोदर लोकांना कार्यालाच्या चकरा माराव्या लागत होत्या. परंतु आता परिस्थिती बदलली आहे. महाराष्ट्रात उज्वला योजनेचे लाभार्थी दिवसेंदिवस वाढत आहे. वर्षाला आता 12 सिलेंडरवर सबसिडी देण्यात येत आहे. असे ते म्हणाले.

निवणुकीपूर्वीची ही तयारी तर नाही ना? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की जलजीवन मिशन या योजनेची माहिती देताना त्यांनी सांगितले की या योजनेची कामे सुरू आहे. आणि ज्या ठिकाणी ही कामे झालेली नाही त्या ठिकाणी लवकरच होणार आहे. शहरी विकास हा हिट आहे अगोदर 17% जनता ही शहरात राहत होती तर आता ही टक्केवारी वाढून 35% पर्यत गेली आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा बाबत उत्तर देतांना ते भावुक झाले व संपूर्ण जगात राम मंदिराबाबत उत्सव साजरा केला जात असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी, हंसराज अहिर मंत्री राष्ट्रीय ओबीसी आयोग, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, तारेंद्र बोर्डे भाजप जिल्हाध्यक्ष, गजानन विधाते, विजय पिदूरकर, दिनकर पावडे, रवी बेलूरकर, श्रीकांत पोटदुखे व पत्रकार उपस्थित होते.

बुकिंगसाठी बॅनरवर क्लिक करा...

Comments are closed.